अप्सरा आली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन-नटरंग 

गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - बेला शेंडे,  अजय गोगावले,  अतुल गोगावले
चित्रपट - नटरंग

अप्सरा आली इंद्रपुरीतुन
कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली
सोन्यात सजली रूप्यात भिजली रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार

ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वाऱ्याची

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदनी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदनं न्हाली

Labels: , , ,



comment closed

Sign-up for FREE daily Updates.
Powered by Blogger.